अनिल दत्तात्रय चाचर

अनिल दत्तात्रय चाचर

मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथ.शाळा

सायबेज आशाने कामे केली तिथे नेहमीच आशादायक चित्र निर्माण झालेले पहायला मिळते .मी जिल्हा परिषद प्राथ.शाळा-हनुमानवस्ती मुख्याध्यापक गेली पाच वर्षापासून संरक्षक भिंतीसाठी प्रयत्न करत होतो.पण खर्या अर्थाने सायबेज आशा ट्रस्ट माझ्या मदतीला धावून आले.हनुमानवस्ती तशी २८ घरांची लोकवस्ती.स्थानिक-०८ मुले.इतर मुले डोंबारी व पारधी समाजाची २६ मुले अशी ३४ मुले शिक्षण घेत आहेत.माझ्या शाळेच्या RTE नुसार ९बाबी पुर्ण होत्या.पण संरक्षक भिंत नव्हती.एवढ्याशा छोट्या शाळेसाठी सायबेज आशा ट्रस्टने संरक्षक भिंत बांधून दिल्यामुळे आमच्या शाळेचा परिसर सुंदर ,बोलका आणि पर्यावरणपूरक झाला आहे.भविष्य काळातही सायबेज आशा ट्रस्टने ग्रामविकासाबरोबरच आदिवासींचे शिक्षण,स्थलांतरीत मुलांचे शिक्षण,बालमजूर,बालविवाह,उसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण,वीटभट्टी मजूर,कोळसा मजूर,बांधकाम मजूर मुले अशा शाळा बाह्य मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायला हवी.

संदीप  देवकर

संदीप देवकर

ग्रामस्त मावडी

मावडी सुपे 1500 लोकसंख्या आसलेले गाव या गावाची आणी सायबेज आशाची गाठ पडते काय आणी सर्व गावचा नुरच पालटून जातो काय पुंरदर तालुकयात सर्व प्रथम ओढा खोलीकरण 3की मी चे काम मावडी सुपे गावात केले नंतर खोलीकरण झाल्यावर बांध घालुन लाखो रूपये खर्च करून जे काम सरकारी खर्च त होते ते काम अगदी कमी खर्च त मावडी केले गरीब कुटुंबासाठी 38 शौचयालय बांधुन दिली आरोग्य शिबीर वृश लागवड विद्यार्थी नसाठी काँलरशीप इमारतीसाटी निधी दिला ऐक नाही तर अनेक कामे करून सायबेज आशा व प्रशांत सर व त्याच्या टीमने मावडी सुपे गावाचा कायापालटच करून टाकला आहे म्हणून या गावाला आदर्श गाव पुरस्कार प्रकाश आमटे यांच्या हसते दिला आहे.या सर्व कामाची दखल घेउन सकाळ रिलीफ फ&डाने गाळ काढायलाज दोनदा निधी दिला या सर्व कामाच्या मागे सायबेज आशाचा हात होता म्हणून आंधाराकडुन प्रकाशाक न डे नेणारी वाट सायबेज आशाचया धातूॅतव&ला मावडी सुपे गावाचा सलाम.

भामे चंद्रकांत ज्ञानोबा

भामे चंद्रकांत ज्ञानोबा

उपसरपंच मावडीकडेपठार

जेथे जेथे विकासाची झाली दुरदशा तेथे तेथे पोहोचली सायबेज आशा.प्रत्येक गावाची एकच भाषा विकासाच्या साथीला आसावी सायबेज आशा.दोस्त हो मी भामे चंद्रकांत ज्ञानोबा उपसरपंच मावडीकडेपठार अभिमानाने सांगत आहे कि आमच्या गावात शासना पेक्षा मोठी आणी नियोजन पुर्वक कामे केलेली आहेत आरोग्य स्तर उंचवण्या साठी बंदिस्त गटार योजना.प्राथमिक शाळेचे वाँल कंपाउंड.जलयुक्त शिवार योजनेतुन तिन कि मी चे ओढा खोलीकरण.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बेंचेस.स्वच्छ भारत अभीयानातुन ६० सुसज्ज शौचालये बांधकामे अशी कामे केवळ दोन वर्षात पुर्ण करुन आदर्श निर्माण केला आहे याच कामा साठी शासन दरबारी हेलपाटे मारुन १० वर्षे लागली असती .त्या मुळे सायबेज आशा हि कंपनी नाही तर एक विचार आहे .संघटन ,नीयोजन, नेत्रूत्व, संपर्क ,माणव विकास.या बाबतीत सायबेज आशा ट्रस्ट ला तोड नाही.विचार.आचार,प्रसार या मधेही हि अग्रेसर आहे.गोरगरीब लोकांमध्ये एक आशेचा किरण आहे सायबेज आशा ट्रस्ट.

Pandit Tapare

Pandit Tapare

Member Rivka Sahil Akshar Institute

Asha Cybage Trust, Pune is a boon to our Rivka Sahil Akshar Institute-the Institute for the mentally retarded children / adults. on account of this boon –School Bus forty children from ten villages from very poor families can now take education . This helping hand really uplifted these gifted children/ adults.

प्रकाश मोहनराव वदने पाटील

प्रकाश मोहनराव वदने पाटील

गावकरी भटकूड गाव

“CYBAGE ASHA” represents the well-being of people living in rural areas ensures sustainable development. As a team they works with local administration to achieve community development goals and construct roads, provide drainage systems and focusing and developing victims in rural areas. Respected Arun Sir, Dipak Sir, And Ritu madam the visionary persons gearing up all teams towards good future of all employees and society.

सोमनाथ म्हस्के

सोमनाथ म्हस्के

ग्रामस्त नावळी ता.पुरंदर जि.पुणे

सायबेज आशा ट्रस्ट ही संस्था गोरगरीब लोकांमध्ये नावलौकीक मिळवणारी आदर्श संस्था ठरली.सायबेज आशामुळे गावातील गोरगरीब व आर्थिक मागास लोकांमध्ये उज्जवल भविष्यकाळ बघण्याची अाशा निर्माण झाली,नावली गावामध्ये १००/ हागणदारी मुक्त होण्यामध्ये सायबेजआशाचा सिंहाचा वाटा आहे,त्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आम्ही यशस्वी झालो.ज्या लोकांची शौचालय बांधण्याची क्षमता नव्हती त्या लोकांना शौचालय बांधण्याकामी सायबेजआशामुळे मोठी मदत झाली. कपनीकड़ुन नावलीमध्ये बधारे ,झाड़े लागण ,सौरदिवे , असे बरीचशी कामे जाली गावाच्या विकासामध्ये सायबेज आशाने वाटा उचल्यास गावामध्ये विकासाची गंगा वाहील त्यामुळे आमच्या सारख्या तरूण मुलांना सामाजिक काम करायला खुप आनंद होईल.सायबेज आशामुळे नावलीच्या विकासाचा भविष्यकाळ नक्कीच उज्जवल असेल यात तिळमाञ शंका नाही येणाय्रा काळामध्ये सायबेज आशाने नावली गावच्या विकासात मोलाची साथ द्यावी हीच अपेक्षा.

महादेव रामचंद्र पिलाणे

महादेव रामचंद्र पिलाणे

सदस्य ग्रा.पं. लपतळवाडी ता.पुरंदर जि.पुणे

सायबेज आशा ट्रस्ट ही संस्था गोरगरीब लोकांमध्ये नावलौकीक मिळवणारी आदर्श संस्था ठरली .सायबेज आशामुळे गावातील गोरगरीब व आर्थिक मागास लोकांमध्ये उज्जवल भविष्यकाळ बघण्याची अाशा निर्माण झाली,लपतळवाडी गावामध्ये १००/ हागणदारी मुक्त होण्यामध्ये सायबेज आशाचा सिंहाचा वाटा आहे,त्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आम्ही यशस्वी झालो. ज्या लोकांची शौचालय बांधण्याची क्षमता नव्हती त्या लोकांना शौचालय बांधण्याकामी सायबेज आशामुळे मोठी मदत झाली. सायबेज खुशबु ट्रस्टच्या माध्यमातुन गोरगरीब विद्यार्थ्यािना ४० हजार रूपयाची शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक वर्षात मोलाची कामगिरी केली, गावाच्या विकासामध्ये सायबेज आशाने वाटा उचल्यास गावामध्ये विकासाची गंगा वाहील त्यामुळे आमच्या सारख्या तरूण मुलांना सामाजिक काम करायला खुप आनंद होईल . येणाय्रा काळामध्ये सायबेज आशाने लपतळवाडी गावच्या विकासात मोलाची साथ द्यावी हीच अपेक्षा.

विक्रम बाळासाहेब कंक

विक्रम बाळासाहेब कंक

कार्यकर्ता सुरवड ता.वेल्हे जि.पुणे

सायबेज आशा समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या घटकाच्या विकासासाठी जे मोलाचे काम करते आहे ते खरच वाखानन्यासारखे आहे आणि या घटकाचा विकास करुण नक्कीच देशाच्या प्रगतिला हातभार लावते आहे.सायबेज आशा गेल्या दीड वर्षापासून आमच्या गांवामधे काम करते आहे .गांवचा विकास करने ही निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचीच जबाबदारि नाही तर गावातल्या प्रत्येक नागरिकांची आहे ही भावना गावकर्यांच्या मनात सायबेज आशा ने निर्माण करुण दिली आणि यातूनच आमचा तरुण वर्ग एकत्र आला व गांवच्या विकासासाठी मनापासून कार्यरत झाला.सायबेज आशा समाजासाठी करत असलेल्या कामासाठी आमचा मनापासून सलाम आपला सपोर्ट असाच आमच्या गावाला राहु दया ही विनंति.

रवींद्र  घोरपडे

रवींद्र घोरपडे

रंगारी खुळेवाडी

२००९ साली सायबेज आशा ने आमच्या खुळेवाडी वस्तीत व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. दर रविवारी मी त्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन उपचार घेउ लागलो आणि वर्षभरातच माझी दारू पूर्णपणे सुटली. त्यावेळेच्या माझ्या अवस्थेबद्दल नकारात्मक भूमिका बदलणे हे खूप अवघड होते पण सातत्याच्या समुपदेशनाने हे शक्य झाले आणि औषधोपचाराने माझा आहार आणि विश्रांती देखील सुधारली. ज्या वस्तीला माझी ओळख मी एक ‘बायकापोरांना मारणारा दारुडा’ अशी होती त्या वस्तीतील लोकांसमोर माझा सायबेजआशा ने दारू सोडल्याबद्दल सत्कार केला. त्या नंतर एका आठवड्याने माझी नियुक्ती वस्ती समन्वयक म्हणून करण्यात आली. मागील पाच वर्षात जवळपास २५ व्यसनाधीन व्यक्तींना मी दारूपासून दूर राहण्यासाठी मदत केली आहे. मला माझ्या पत्नीच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेला अभिमान दिसून येतो. माझे हे परिवर्तन केवळ सायबेजआशामुळे होऊ शकले. मला परिवर्तनाचे माध्यम बनविल्या बद्दल मी सायबेजआशा चे आभार मानतो.

डॉ. अजय दुधाणे

डॉ. अजय दुधाणे

संस्थापक व अध्यक्ष आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना १५ ऑगस्ट २००९ ला झाली. सायबेजआशा सोबत एक वर्षाहून जास्त काळ आम्ही काम करीत आहोत. त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे आम्ही गरीब व्यसनाधीन व्यक्तींसाठी एप्रिल २०१६ आणि ऑगस्ट २०१६ मध्ये दोन १० दिवसीय निवासी व्यसनमुक्ती शिबिरे आयोजित केली होती. २५ व्यसनाधीन व्यक्तींना या शिबिरांचा लाभ मिळाला. सायबेज आशा ने २०१५-१६ साली दिवाळी देणगी देऊन आम्हाला मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही नगर रस्त्यावरील आंबेडकर नगर येथे कुटुंब समुपदेशन व व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन करणे चालू केले. माहितीपत्रक वितरण, पथनाट्ये, आर्थिक मदत यासारख्या उपक्रमांतून सायबेजआशा आणि त्यांच्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या भरीव पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही अधिक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू व अधिक कुटुंबांना व्यसनाच्या विळख्यापासून मुक्त करू.