सायबेजआशा ने वानप्रस्थाश्रम वृद्धाश्रमाला शुद्ध पाणी आणि मनोरंजन मिळावे यासाठी केली मदत
तळेगाव येथील वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमाला एक दूरचित्रवाणी संच आणि पाणी शुद्धीकरण यंत्र दान केले.
01-10-2016: 

दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या म्हणजे वृद्धत्व, आणि आता हि एक सामाजिक समस्या झाली आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर त्या वृद्धाश्रमात मुलभूत सुविधा निर्माण करणे हे संचालकांसमोर असणारे आव्हान आहे. अविरत सामाजिक काम करून गरीब गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविणे या कार्यपद्धतीला अनुसरून सायबेज आशा ने तळेगाव येथील वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमाला एक दूरचित्रवाणी संच आणि पाणी शुद्धीकरण यंत्र दान केले.

निवृत्त सेवा संघाने २४ मार्च १९९३ साली या वृद्धाश्रमाची स्थापना केली. आजमितीला या वृद्धाश्रमात ४० वृद्ध राहतात. गेल्या वर्षी देखील या वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना गरम पाणी मिळावे यासाठी पाणी गरम करण्याचे सौर यंत्र सायबेज आशा ने दान केले होते. याच बरोबर या वृद्धाश्रमाच्या आंगणात एक शेड सुद्धा बांधून दिली गेली होती.