पाच सामाजिक संस्थांमार्फत सायबेजआशा ने उजळली वंचितांची दिवाळी.
पाच सामाजिक संस्थांमार्फत सायबेजआशा ने उजळली वंचितांची दिवाळी.
25-10-2016: 

दरवर्षी प्रमाणे यंदाही वंचितांची दिवाळी उजळावी यासाठी सायबेजआशा ने पाच सामाजिक संस्थांना २४ लाख रुपये दिवाळी देणगी दिली.

सायबेज कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागातर्फे पाच सामाजिक संस्थांना उदारपणे देणगी देण्यात आली. यात ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय, श्री सद्गुरू सेवा मंडळ, वयम व सहेली या संस्था अतिशय काळजीपूर्वक व पारदर्शक पद्धतीने निवडण्यात आल्या होत्या.

सायबेज कंपनीच्या संचालिका आणि सायबेजआशा संस्थेच्या विश्वस्त सौ. रितू नथानि आणि सायबेज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरुण नथानि यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना धनादेश देण्यात आले. त्यानंतर श्री अरुण नथानि यांनी सायबेजआशा संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले व ज्या अभियंता गटाने या संकेतस्थळाची निर्मिती केली त्यांना गौरवान्वित करण्यात आले.

सामाजिक संस्थांविषयी

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान – हि संस्था अंध व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यास मदत करते,

एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय – अनेक गरीब रुग्णांना मोफत नेत्रोपचार दिले जातात.

श्री सद्गुरू सेवा मंडळ – ह्या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी वसतिगृहाची सोय केली जाते

वयम – आदिवासी गावात अनेक प्रकारची विकासकामे हि संस्था करते.

सहेली – लाल बत्ती वस्तीतील महिला व त्यांच्या लहान मुलांसाठी हि संस्था काम करते.