सायबेजआशा ने केला सुखकर विकलांग मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास
सायबेजआशा ने केला सुखकर विकलांग मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास
28-08-2016: 

सायबेज अशाने रिवका साहिल अक्षर संस्थेला स्कूलबस दान केली. सातारा जिल्यातील वाई येथे संस्थेच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात गाडीची चावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अविनाश टापरे, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि सायबेजआशा च्या  मुख्य समिती चे सदस्य उपस्थित होते. 

रिवका साहिल अक्षर संस्था ११ मे १९८२ साली स्थापन झाली. संस्थेच्या वतीने विकलांग विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि एक शाळा चालविली जाते. भारतीय पुनर्वसन परिषदेशी संलग्न असा एक फौंडेशन कोर्स देखील शिक्षकांसाठी चालविला जातो.

सातारा जिल्यातील दुर्गम भागात वसलेल्या वाई तालुक्यात रस्त्यांचे जाळे फारसे चांगले नाही. त्यामुळे विकलांग मुलांना  प्रवास करणे अवघड जाते. दुर्गम गावात राहणाऱ्या मुलांचे पालक गरिबीमुळे व कठीण अशा वाहतूक व्यवस्थेमुळे मुलांना शाळेत पाठवीत नाहीत. या अश्या स्थितीमुळे संस्थेला वाहतूक व्यवस्थेसाठी एका बस ची नितांत आवश्यकता होती. सायबेज आशा ने बस दान केल्याने आता या विद्यार्थ्यांचे शाळेत येणे सुगम झाले आहे.

कार्यक्रमात डॉ अविनाश यांनी सायबेज आशा चे आभार मानले. विकलांग मुलांच्या समस्या त्यांनी या प्रसंगी मांडल्या. ग्रामीण भागातील पालकांच्या अज्ञानावरही त्यांनी प्रकाश टाकला. सायबेजआशा ने दिलेल्या बस चा फायदा १८ गावातील ५० विद्यार्थ्यांना जीवनावश्यक कौशल्ये शाळेत येऊन शिकण्यासाठी होऊ शकेल असही ते म्हणाले. सायबेज आशा च्या मदतीमुळे संस्था आपले ध्येय “बढेंगे, परंतु धीरे धीरे” गाठू शकेल