सायबेजआशा ने बदलला सुरवड चा चेहरा मोहरा
सायबेजआशा ने बदलला सुरवड चा चेहरा मोहरा
27-03-2016: 

सुरवड हे वेल्हे तालुक्यातील छोटेसे गाव. सायबेज मध्ये काम करणारे विक्रम कंक यांनी विशेष प्रयत्न करून सायबेज आशा च्या माध्यमातून गावात बदल घडवले. प्राथमिक सर्वेक्षणानंतर सायबेज आशा ने गावाच्या शाळेला संरक्षक भिंत व गावाला भूमिगत गटारे बांधून देण्याचे निश्चित केले.

सायबेज आशा ने गावकऱ्यांच्या सहभागाने हे काम पूर्ण करून गावकऱ्यामध्ये आनंद व समाधान पसरवले आहे. या विकासकामांमुळे आरोग्याविषयीचे प्रश्न अतिशय कमी झाले आहेत. सांडपाणी बंद गटारातून वाहते व वातावरण स्वच्छ राहते डास होत नाहीत पर्यायाने आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही. शाळेला संरक्षक भिंतीमुळे एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. शाळेतील मुले आता वेगवेगळे उपक्रम करू लागले आहेत. त्यांना खेळायला सुद्धा चांगले मैदान मिळाले आहे. सायबेज आशा ने संरक्षक भिंती साठी ४ लाखाची तर भूमिगत गटारांसाठी ५ लाखाची मदत केली शिवाय ३०% लोकसहभाग देखील या कामात मिळवण्यात सायबेज आशा यशस्वी झाली आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना दीपक नाथानी म्हणाले, उत्साही गावकऱ्यांची मदत करण्यास सायबेज आशा नेहमीच टायर आहे. मला सुरवड ग्रामस्थांचा उत्साह आणि विकासकामात त्यांनी घेतलेला पुढाकार पाहून आनंद वाटतो. भविष्यातही हे नाते कायम ठेऊन येथील विकासकामात सायबेज आशा गावाला मदत करेल.

गावाचे उप सरपंच म्हणाले गावात विकासकामे करून गावाचे रूप पालटून टाकल्या बद्दल सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मी सायबेज आशा संस्थेच्या विश्वस्त व स्वयंसेवक कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो. भविष्यातही आम्ही सायबेज आशा च्या मदतीने विकासकामे करत राहू.