सायबेजआशा ने आयोजित केले निवासी व्यसनमुक्ती शिबीर
सायबेजआशा ने आयोजित केले निवासी व्यसनमुक्ती शिबीर
15-09-2016: 

जर तुम्ही कधी व्यसनाधीन व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला व्यसनाधीनतेची भयावहता लक्षात येईल. व्यसनाच्या मार्गावरून परत येताना व्यसनावर असलेले भयानक अवलंबन कसे परावृत्त करते ते हि समजेल. अश्या व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून रोजगारासाठी प्रवृत्त करणे व सामान्य सुखी जीवन जगण्याची संधी प्राप्त करून देणे हेच या व्यसनमुक्ती शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. \

आनंदवन या संस्थेसोबत सायबेज आशा ने १० दिवसांचे नि:शुल्क व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले होते. एकूण १२ व्यक्तींनी याचा लाभ घेतला.  यातील ६ व्यक्ती सायबेज आशा व्यसनमुक्ती केंद्र चालवत असलेल्या वस्ती मधील होत्या. अश्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन पूर्वीदेखील सायबेज आशा व आनंदवन यांनी संयुक्तपणे केले होते. पहिले शिबीर एप्रिल १६ मध्ये आयोजित करण्यात आले होते.

ज्या व्यक्तींना निवासी उपचारांचा फायदा त्यांच्या गरिबीमुळे परवडत नाही अश्या गरीब व्यसनाधीन व्यक्तींना या नि:शुल्क व्यसनमुक्ती शिबिरातून मिळावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या दहा दिवसांच्या शिबिरात औषधोपचार, योगाभ्यास, समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, चर्चासत्रे अश्या अनेक गोष्टींचा समावेश करून शिबिरार्थींना व्यसन पासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. समारोपाच्या दिवशी श्री. श्रीपाद इनामदार फायनान्स कंट्रोलर सायबेज हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.