प्र. सायबेजआशा काय आहे ?
उत्तर

सायबेज आशा हि सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागातील दोन संस्थांपैकी एक संस्था आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तीचे परस्पर संबंध दृढ करण्यासाठी व ग्रामीण व शहरी भागातील दरी भरून काढण्यासाठी सायबेज आशा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील सर्व स्थरातील आणि सर्व वयोगटातील वंचित, उपेक्षित, दुर्बल, दिव्यांग व्यक्ती व ग्रामीण गरजू लोकांना मदत करणे हा संस्थेचा प्राथमिक उद्देश आहे.

प्र. सायबेजआशा सोबत काम करण्यासाठी नोंदणी कशी करावी ?
उत्तर

ज्या व्यक्ती सायबेज आशा सोबत काम करू इच्छितात त्यांनी csr_team@cybage.com या मेल आयडी वर मेल करावा.

प्र. कोणीही व्यक्ती सायबेजआशा ला देणगी देऊ शकतो का ? अशा प्रकारची देणगी दिल्यास प्राप्तिकरातून सूट मिळू शकेल का ?
उत्तर

होय. कोणीही व्यक्ती जो सायबेज आशा ला देणगी देईल त्याला प्राप्तिकरातून८० Section 80G of the Income Tax Act, 1961 नियमान्वये सूट मिळेल.

प्र. सायबेजआशा ची कार्यपद्धती काय आहे?
उत्तर

सी. एस. आर. टीम, सी. एस. आर. कमिटी, आणि स्वयंसेवक हे सर्वजण मिळून सायबेजआशाच्या  कामाचे नियोजन करतात. स्वयंसेवी संस्था असल्याने येथे प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा मनाला जातो. स्वयंसेवक कार्यकर्त्यांना त्यांचा सहभाग वेळेच्या स्वरुपात, विविध नाविन्यपूर्ण कल्पनांच्या स्वरुपात देण्याचे आवाहन सायबेजआशा नेहमीच करते.

प्र. सायबेजआशाच्या कामात सहभागी होण्यासाठी काय करावे ?
उत्तर

ज्या व्यक्ती सायबेजआशा सोबत काम करू इच्छितात त्यांनी csr_team@cybage.com या मेल आयडी वर मेल करावा. त्या मेल मध्ये आपणांस कोणत्या कार्यक्रमात अथवा प्रकल्पात भाग घ्यायचा आहे ते लिहावे. अशा प्रकारचे कार्यक्रम व विविध भेटी शनिवार व रविवार आयोजित केल्या जातात. मेल प्राप्त झाल्यावर सी. एस. आर. एक्सिक्युटीव आपणांस संपर्क साधतील व आपल्याला आपले योगदान देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करतील.

प्र. सायबेजआशा चे स्वयंसेवक कार्यकर्ते सी. एस. आर. कमिटी मध्ये भाग घेऊ शकतात का ?
उत्तर

जे स्वयंसेवक कार्यकर्ते सायबेजआशा च्या विविध कार्यक्रमांत सातत्याने भाग घेतात, समर्पित भावनेने आपला वेळ देतात व समाजाशी असलेली बांधिलकीची जाणीव ठेवतात त्यांना कालांतराने सी. एस. आर. कमिटीत भाग घेता येऊ शकतो. सी. एस. आर. कमिटी हि सी. एस. आर. टीम ला विविध प्रकल्प आणि कार्यक्रम सुचवते. त्यानंतर सी. एस. आर. टीम स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या मदतीने हे सर्व नियोजित कार्यक्रम पार पाडते.

प्र. स्वयंसेवक कार्यकर्ता बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
उत्तर

थोडा मोकळा वेळ, सहनशीलता, आणि उत्साह हे गुण स्वयंसेवक बनण्यासाठी आवश्यक आहेत. सायबेजआशाचे कार्यकर्ते बनून समाजामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सायबेजआशा हे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देते. तुम्ही आपले कौशल्य व विविध संकल्पनांच्या द्वारे देखील सहभागी होऊ शकता.

प्र. सायबेजआशा चे सगळे कार्यक्रम स्वयंसेवक कार्यकर्त्यांना अनिवार्य आहेत का ?
उत्तर

नाही. स्वयंसेवक त्याच्या आवडी व सवडी प्रमाणे विविध कार्यक्रमात भाग घेऊ शकतात.आम्ही स्वयंसेवकांनी निवडलेल्या कामात त्यांची बांधिलकी व समर्पणाची अपेक्षा बाळगतो.

प्र. प्रत्येक स्वयंसेवक कार्यकर्त्याला आर्थिक देणगी देणे गरजेचे आहे का ?
उत्तर

नाही. आर्थिक देणगी देणे आवश्यक नाही. देणगी देणे ऐच्छिक आहे.

प्र. देणगी देण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा?
उत्तर

ज्यांना आर्थिक देणगी द्यायची आहे त्यांनी सी. एस. आर. एक्सिक्युटीव शी संपर्क साधावा. प्रत्येक देणगीसाठी योग्य ती पावती देण्यात येईल.

प्र. स्वयंसेवक कार्यकर्ता सायबेजआशा च्या वितरण यादीला (DL)मेल लिहू शकतो का ?
उत्तर

नाही. ज्यांना काही समस्या अथवा सूचना करायच्या असतील त्यांनी csr_team@cybage.com ला मेल लिहावा.

प्र. अचानक रक्ताची गरज असल्यास कोणाला सांगावे?
उत्तर

अचानक रक्ताची मदत लागत असेल तर csr_team@cybage.com ला मेल लिहावा. आम्ही खातरजमा करून योग्य ती मदत करू.