
पहिले पाउल चांगल्या विचारांचे, दुसरे चांगल्या शब्दांचे व चांगल्या कृतीचे तिसरे पाउल टाकत सायबेज कंपनीने २००३ साली सायबेजआशा या सामाजिक विश्वस्त संस्थेची स्थापना केली. सायबेजआशा माणुसकी आणि समानता या मूल्यांना महत्व देते. एकाग्रता आणि उत्साह यांच्या अचूक मिश्रणातून वंचितांच्या जीवनात हसू फुलविण्याचे काम सायबेजआशा निरंतर करीत आहे.
सी. एस. आर. टीम आणि समाजाप्रती जाणीव असणारे संवेदनाशील स्वयंसेवक कार्यकर्ते एकत्र मिळून अनेक जीवने उजळविण्याचे काम सायबेजआशा च्या माध्यमातून करीत आहे. सायबेज कंपनीच्या संचालिका रितू नाथानी या प्रत्येक प्रकल्पात मनापासून मार्गदर्शन करतात.
सायबेजआशा हि संस्था, स्वयंसेवक कार्यकर्ते आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्या आधाराने अत्यंत संघटीतपणे कार्य करते. प्रखर इच्छाशक्ती, समर्पण आणि समाज परिवर्तनाचे ध्येय मनाशी बाळगून सायबेजआशा चे स्वयंसेवक कार्यकर्ते अनेकांची जीवने बदलून टाकण्याच्या कामात मग्न असतात.
ग्रामीण जनतेच्या शाश्वत उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन निरंतर मदत करणे हा सायबेजआशा चा दीर्घकालीन कार्यक्रम आहे. काटेकोरपणे नियोजित अल्पकालीन प्रकल्पांच्या माध्यमातून सायबेजआशाचे कार्यकर्ते समाजातील दुर्बल, वंचित, अंध, दिव्यांग, विधवा, महिला व वृद्ध घटकांपर्यंत पोहोचतात. सायबेजआशा विविध सामाजिक संस्थांसोबतही काम करून हसू फुलविण्याचे प्रयत्न करते.
समाजोन्नती करण्यासोबतच आपल्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांना अधिक चांगले माणूस बनविण्याचा प्रयत्न करणे हे सायबेज आशाचे वैशिष्ट्य आहे.
आमचे विभाग
समाजामध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी सायबेजआशा ने पुढील विभाग केले आहे
ग्रामविकास व्यसनमुक्ती सामाजिक कल्याण पर्यावरण
विश्वस्त




अरुण नाथानि हे सायबेज कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अरुण च्या विचार प्रक्रियेतून उगम पावलेली सायबेज हि संकलित माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेणारी कंपनी आहे. संगणकप्रणाली रचना अभियंता म्हणून अरुण ने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरवात केली आणि आजतागायत ते संगणक प्रणाली विकसन आणि गुणवत्ता व्यवस्थापन यामध्ये आपले योगदान देत आहेत. ९० च्या दशकात अमेरिकेहून परत आल्यावर त्यांनी सायबेज कंपनीची स्थापना केली. उत्पादन अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान मध्ये उच्च गुणवत्तेची सेवा देणारी जगातील सर्वात कार्यक्षम माहिती आणि तंत्रज्ञान कंपनी स्थापन करण्याचा त्यांचा मानस होता. ग्राहक केंद्रितता आणि कर्मचारी केंद्रितता याचे संतुलन साधत ग्राहक आणि कर्मचारी यांचे हित साधण्यावर त्याचा विश्वास आहे. शिक्षणातून सामर्थ्य या संकल्पनेवर दृढ विश्वास असल्यानेच सायबेज च्या सामाजिक बांधिलकी विभागातील दोन्ही ट्रस्ट च्या स्थापनेत त्याचा मोलाचा वाट आहे. त्यांना नॅशनल अवार्ड्स इन आय टी कडून सी इ ओ ऑफ द इयर हा सन्मान प्राप्त झाला आहे. जागतिक मानव संसाधन विभाग कॉंग्रेस आणि इ टी नाऊ च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रतिभा आणि मानव संसाधन नेतृत्व या विषयावर झालेल्या परिषदेत ‘मानव संसाधन अभिमुख मुख्य कार्यकारी अधिकारी’ हा पुरस्कार त्यांना दिला गेला. एशिया पॅसिफिक एच आर एम कॉंग्रेस मध्ये ग्लोबल एच आर एक्सेलंस पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. अरुण एक मनस्वी लेखक देखील आहेत. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रसंगातून व्यवस्थापनाचे धडे कसे मिळतात हे अरुण आपल्या ब्लॉगवर कायम लिहित असतात. सायबेज कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनेक वाचक त्यांचा ब्लॉग वाचत असतात.
शैक्षणिक दृष्ट्या दंतवैद्य असलेल्या पण समाजसेवेचा ध्यास आणि आवड असलेया सौ रितू नथानि ह्या सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि. च्या सह्संस्थापिका आणि संचालिका आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकी विभागातील योगदानाबद्दल डिसेंबर २०११ मध्ये भारतीय नारी नेतृत्व पुरस्काराच्या तिसऱ्या पर्वात ‘आघाडीच्या सल्लागार’ म्हणून त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते. सायबेजच्या सामाजिक बांधिलकी विभागातील सायबेजआशा आणि सायबेजखुशबू या दोन्ही संस्थांचे नेतृत्व त्या समर्थपणे करत आहेत. सन २०१२-१३ साली रीतु नी YI ( भारतीय उद्योग मंडळ युवक व्यासपीठ ) या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते काम करीत असताना त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात एका नेतृत्व शिबिरात तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम हे देखील उपस्थित होते. रीतुने जगातील बऱ्याच देशामध्ये या प्रकारच्या कामासाठी प्रवास केला आहे. G20 Young Entrepreneurs’ Alliance Summit या मास्को येथे भरलेल्या संमेलनात त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळात भाग घेतला होता. यानंतर याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान मध्ये गेलेल्या शिष्टमंडळात देखील त्यांनी भाग घेतला होता. दंतवैद्यकीय व्यवसाय सोडल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीच्या म्हणजेच नाटक कला विषयात आपले योगदान दिले. एक दशक त्यांनी वक्तृत्व शिक्षक म्हणून काम केले. ट्रिनीटी कॉलेज, लंडन येथे होणाऱ्या भाषा विषयाच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसत त्यांना रीतुनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतंत्ररित्या नाटक कला शिक्षक म्हणून देखील वेगवेगळ्या शाळेत काम केले आहे.
दीपक हे सायबेज कंपनीचे संचालक आहेत. व्यवस्थापन आणि व्यक्ती व्यक्ती मधील संबंध दृढीकरण ह्या विषयात त्यांचा हातखंडा आहे. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी दृढ संबंध प्रस्थापित केले आहेत. माहिती तंत्रज्ञान उद्योग हा संसाधन केंद्रित आणि जागा केंद्रित आहे असे त्यांचे मत आहे. योग्य व्यक्तींची नेमणूक व सुयोग्य पायाभूत सुविधांचे नुतनीकरण वेळोवेळी आर्थिक संतुलन राखीत करणे हे अंत्यंत महत्वाचे आहे असे त्यांना वाटते. उत्तम कर्मचारी वर्ग आणि योग्य पायाभूत सुविधा या बाबतीत सायबेज ची प्रगती अतिशय झपाट्याने झाली आहे यात दीपकचे सातत्य आणि आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती याचा खूप मोठा वाटा आहे. भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या या समर्पित आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना इंदिरा उद्योग समूहाकडून २०११ साली ‘माहित तंत्रज्ञान उत्कृष्टता पुरस्कार २०११ ने सन्मानित करण्यात आले आहे. सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या आशियायी इम्प्लॉयर ब्रँड पुरस्कार २०१२ कार्यक्रमात त्यांना ‘मानव संसाधन नेतृत्व पुरस्कार’ देखील मिळाला आहे. सायबेजआशाच्या प्रारंभापासून ते स्वत:च्या निवृत्ती पर्यंत म्हणजे ऑगस्ट २०१६ पर्यंत या सामाजिक कामात त्यांनी सक्रीय भूमिका निभावली आहे.
सायबेज च्या मानव संसाधन विकास विभागाची अत्यंत महत्वाची जबाबदारी एल्स्टन पिमेंटा हे सांभाळतात. प्रतिभेचा आदर, संगोपन आणि उपयोजन हे या विभागाचे मुख्य कार्य आहे. गुणवत्ता, सातत्य आणि प्रतिसाद हि महत्वाची मुल्ये दीपस्तंभाप्रमाणे या विभागाचे काम करीत असताना मार्गदर्शक ठरतात. "Bringing Life to Work” “आम्ही कामात चैतन्य आणतो.” हे सायबेज च्या मानव संसाधन विकास विभागाचे ध्येयवाक्य आहे. संपूर्ण उर्जा हि कंपनीच्या दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि लोकांना उन्नतीच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी वापरली जाते. समुपदेशक, प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक अश्या विविध भूमिका एल्स्टन पार पाडतात. ‘माझ्यासाठी मी नसेन तर (दुसरा) कोण असेल? आणि मी फक्त माझ्याच साठी असेल तर मी काय आहे?’ जीवनाविषयीचे त्यांचे तत्वज्ञान या एका बोधवाक्याने प्रेरित झाले आहे. माहिती तंत्रज्ञान संगणक प्रणाली लेखक आणि प्रकाश तंतू तंत्रज्ञानात येण्यापूर्वी २५ वर्षे आपले व्यावसायिक जीवन एक रसायन अभियंता म्हणून त्यांनी सुरु केले. पण मानव व्यवस्थापनामधील त्यांच्या आवडीमुळे त्यांनी मानव संसाधन विभागातच स्थलांतर केले. यामध्ये दिवसेंदिवस त्यांच्या व्यावसायिकतेला झळाळी प्राप्त होत गेली. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकामध्ये त्यांनी सकारात्मक बदल घडविले. त्यांचे उपेक्षित आणि दुर्बल घटकाबद्दल असलेले काम १९८३ पासूनच चालू झाले होते. जुनिअर चेंबर च्या स्थानिक, राज्यीय व देशपातळीवरील दायित्व त्यांनी पार पडले. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत शेवटी १९९४ ते १९९८ ते या संस्थेचे राष्ट्रीय सचिव होते. त्यांनी या सामाजिक कामाबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके मिळविली आहेत. सायबेजआशा आणि सायबेजखुशबू बरोबर अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे.